कुस्ती स्पर्धेत वरणगावच्या ताैसिफ अलींना सुवर्णपदक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस कर्मचारी कुस्ती स्पर्धा ६ व ७ जानेवारी रोजी ठाणे येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत वरणगाव फॅक्टरीचे मल्ल ताैसिफ अली हनीफ यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

या स्पर्धेत एअर फोर्स, नेव्ही. नेव्हल डाक, इन्कम टॅक्स, ऑर्डनन्स फॅक्टरी आदी सेवांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला हाेता. यात वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अग्निशमन विभागातील मल्ल ताैसिफ यांनी ७९ किलो वजन गटाच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. त्यामुळे चंदीगड, हरयाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड निश्चित झाली आहे. या यशाबद्दल ताैसिफ अलींचे फॅक्टरीचे महा प्रबंधक पी.सी. नंदा, क्रीडा अधिकारी व सर्व युनियन पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -