सफाई कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनासह दिवाळी भत्ता द्यावा; मनसेची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । यावल नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन व वीस हजार रुपये दिवाळी भत्ता जाहीर करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात, कोरोनाच्या काळात नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यात मुख्यमत्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच सातवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. बहुतांश ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावल नगरपालिकेत अद्याप या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही. यामुळे येथील नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतनासह दिवाळी भत्ता म्हणून वीस हजार रुपये जाहीर करावे, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, यासंदर्भातील मागणी यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोर्डे यांच्याकडेही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज