कापूस व्यापाऱ्याची हत्या : पोलीस कर्मचारी जाधवसह, गवळी, वाणी, पवार, सारवान, प्रजापतचा होता हात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ रस्तालूट करीत स्वप्नील शिंपी या कापूस व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी संशयितांची ओळख परेड पूर्ण केली असून त्यात पोलीस कर्मचारी नटवर जाधवसह इतर ५ जणांचा समावेश आहे.

एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांचा दि.२६ नोव्हेंबर रोजी पाळधी येथील साईबाबा मंदिराजवळ चारचाकी अडवून खून करण्यात आला होता. स्वप्नील शिंपी यांच्याकडे हवाल्याची ५ कोटी रक्कम असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचारी नटवर जाधव याच्या माहितीवरून हा कट रचण्यात आला होता. जिल्हा पोलिसांनी एलसीबीच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात ६ संशयितांच्या मुसक्या आवळल्या होत्या. संशयितांची ओळख परेड बाकी असल्याने त्यांची नावे प्रसिद्ध करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले होते.

दरम्यान, सोमवारी संशयितांची ओळख परेड पूर्ण झाली असून सर्वांची नावे समोर आली आहेत. संशयितांमध्ये १) पोलीस कर्मचारी नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता.अमळनेर जि. जळगाव) २) कुणाल ऊर्फ सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट, शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा.गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव), ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव) यांचा समावेश आहे. सर्व संशयितांवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून काहींवर गंभीर गुन्हे देखील आहेत.

पोलिसांनी संशयितांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. न्यायालयीन कोठडी अंतर्गत सर्व संशयित जिल्हा कारागृहात असल्याने सहाही संशयितांची ओळख परेड कारागृहातच करण्यात आली. यावेळी धरणगाव तहसीलदार यांनी नियुक्त केलेल्या नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत ओळख परेड झाली. घटनेच्या दिवशी घटनास्थळावर असलेल्या चारही आरोपींची ओळख पटली आहे. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी आहेत. सर्व संशयितांची पोलीस कोठडी मागण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपास सुरू होईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -