स्वप्नीलची मृत्युशी झुंज सुरूच, अजून मदतीची गरज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । गलवाडे ( ता.अमळनेर ) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कोकिळा पाटील यांचा मुलगा स्वप्नील सुदाम पाटील याची रात्री १ वाजेच्या सुमारास पावसामुळे रस्त्यावर काहीच दिसत नसल्याने मोटारसायकल घसरली.’आकाश’ आणि ‘स्वप्नील’ दहा फूट खोल खड्यात जाऊन पडले.आरोळ्या मदतीच्या याचना ऐकू येत होत्या; पण माणुसकीचे दुर्दैव होते. अखेर कोणी तरी आले आणि दवाखान्यात दाखल केले. १९ नोव्हेंबरची ती रात्र स्वप्नीलसाठी काळ रात्र ठरणार होती. डॉक्टरांचे प्रयत्न आणि शिक्षकांच्या मदतीचा ओघ सुरू झाला.आजही त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यासाठी आठ लाख रुपये लागणार आहेत. मदतीची हाक मिळताच शिक्षक वर्ग मदतीला धावला आहे. मात्र, अजून मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास स्वप्नील मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊ शकतो.

सविस्तर असे की, स्वप्नील सुदाम पाटील हा इंटेरिअर डिझायनर म्हणून नुकताच पुण्याला कंपनीत लागला होता. त्याला कंपनीने सुरत येथे कामाला पाठवले. १९ नोव्हेंबर रोजी तो मित्र आकाश याच्यासह मोटारसायकलने सुरत येथे जात होता. रात्री १ वाजेच्या सुमारास पावसामुळे रस्त्यावर काहीच दिसत नसल्याने मोटारसायकल घसरली आणि दहा फूट खोल खड्डयात जाऊन आदळली! स्वप्नीलच्या डोक्याला मार लागला होता. प्रचंड रक्त प्रवाह वाहत होता. आकाश पूर्णपणे भेदरला होता, रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांना, वाहनांना थांबवून मदतीची याचना करीत होता. मात्र, कोणीही थांबत नव्हते. अंधारात स्वप्नीलचा मोबाइलदेखील सापडत नव्हता. बऱ्याच वेळानंतर काही लोक मदतीला धावले. स्वप्नीलचा मोबाइल सापडला. कसे तरी लॉक उघडून त्याच्या आई वडिलांना कळविण्यात आले. स्वप्नीलला धुळ्याच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी रुग्ण वाचू शकत नाही, असे सांगितले. आई कोकिळेचा आवाज जड़ झाला होता, तर वडील सुदामा यांनी डॉक्टरांना तुम्ही फक्त उपचार करा, असे आत्मविश्वासाने सांगितल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. कवटी काढून बाजूला ठेवण्यात आली आहे; परंतु आता मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यासाठी आठ लाख रुपये लागणार आहेत. मदतीची हाक मिळताच शिक्षक वर्ग मदतीला धावला आहे. मात्र, अजून मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास स्वप्नील मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊ शकतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -