स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत युवक बनण्यासाठी दृढ इच्छाशक्ति आणि कणखर मनोबलाची आवश्यकता – ब्रह्माकुमारी मिनाक्षी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । असंख्य युवकांचे आदर्शस्थान आणि जगात भारतीय संस्कृतीस आदराचे स्थान देणारे स्वामी विवेकानंद यांनी ज्या शंभर युवकांची अपेक्षा व्यक्त केली होती ते घडण्यासाठी दृढ इच्छाशक्ति आणि कणखर मनोबलाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी राष्ट्रीय युवक दिन प्रसंगी व्यक्त केले.

ब्रह्माकुमारीज् युवा प्रभाग, राजयोग शिक्षा आणि अनुसंधान तर्फे ढाके कॉलनीस्थित सेवाकेंद्रात युवक दिवसानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणा·या युवकांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी ब्रह्माकुमारीज् उपक्षेत्रीय निर्देशिका ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी बोलत होत्या. स्वामी अर्थात् पवित्रतेचे प्रतिक विवेक अर्थात जागृतेचे प्रतिक आनंद अर्थात संपन्नतेचे प्रतिक मिळून स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य घडलेले आहे. मला शंभर समर्पितवृत्ती असलेले युवक द्या मी भारतास स्वर्ग बनवून दाखवीन त्यांच्या अपेक्षेत खऱ्या उतरणाऱ्या युवकांनी ठरविले तर भारतात पुन्हा एकदा सोन्याचा धुर अर्थात संपन्नता येऊ शकेल. त्यासाठी पाच गोष्टी धारण कराव्या लागतील त्या म्हणजे आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मज्ञान, आत्मसंयम, आत्मानुभूती होय. असे प्रेरित युवकच भारत शक्तिशाली बनवितील. व्यासपिठावर डॉ. अपर्णा भट, ज्ञानेश्वर उद्देवाल उपस्थित होते.

तत्पूर्वी स्वामीजींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रस्तावनेत बी.के. संदिप यांनी युवा प्रभागद्वारा होत असलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा आढावा घेतला. बी.के. भाग्यश्री यांनी ब्रह्माकुमारीज् विद्यालयाद्वारे होत असलेल्या सर्वांगिण सेवांचा उल्लेख केला. बी.के. वैष्णवी यांनी राजयोग आणि त्याद्वारे होणारे लाभ या विषयी मनोगत व्यक्त केली. बी.के. वर्षा यांनी सूत्रसंचलन आणि आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी बी.के. पंकज पाटील, सुधाकर शिंपी, राजू भाई आणि सहका·यांनी परिश्रम घेतले. सर्व कोवीड प्रोटोकॉल लक्षात घेता कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.

या युवकांचा झाला प्रातिनिधीक सन्मान :

डॉ.अपर्णा भट, नृत्यप्रशिक्षक तथा अध्यक्ष, प्रभाकर कला संगीत ऍकेडमी, ज्ञानेश्वर उद्देवाल, जिल्हा संघटन मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव, प्रा.समीर घोडेस्वार, क्रीडा शिक्षक, ललवणी कनिष्ठ विद्यालय जामनेर,
पियुष पाटील, समाजसेवक तथा संयोजक रक्तदान संघ, महाराष्ट्र राज्य आकाश धनगर, राज्य संयोजक, भरारी फाऊंडेशन उमेश सोनार, बायो सर्जिकल उत्पादन निर्माता, प्रा. पुरुषोत्तम घाटोळे, कला शिक्षक, मु.जे. महाविद्यालय, प्रा. पियुष बडगुजर, चित्रकला प्रशिक्षक, मु.जे. महाविद्यालय,

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -