साकेगावात युवकाचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा संशय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका २२ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. भरत रमेश भोई (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. ही घटना काल रात्री उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली.

याबाबत असे की, काल शुक्रवारी भरत भोई या युवक जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला रात्री आठच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर डॉ. भालचंद्र चाकूरकर आणि डॉ. नजीमुद्दीन तडवी यांनी त्याला मृत घोषीत केले. या तरूणाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून काहींच्या मते तो डंपरखाली आला तर काहींच्या मते त्याच्यावर मातीचा ढिगारा कोसळल्याचे सांगण्यात आले. तर काहींनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याबाबत पंचनामा करून प्राथमिक चौकशी केली आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -