निलंबीत एस.टी. कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । निलंबित करण्यात आलेल्या एस.टी. कर्मचाऱ्याने आगारातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दि ९ रोजी रावेर येथील बस बसस्थानकात घडली. यामुळे बसस्थानकात एकाच खळबळ उडाली.

राहुल वाघ हे राज्य परिवहन महामंडळाच्या रावेर आगारात कार्यरत असून त्यांना संप काळात निलंबीत करण्यात आले आहे. कर्मचाऱ्याने गुरुवार दि.९ रोजी रावेर स्थानकात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्याने विष प्राशन केल्याचे कळताच त्यांना प्रथम रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्रथोमपचार करून त्यांना सावदा येथील गजाजन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या या कर्मचाऱ्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. याप्रकरणी रावेर पोलिसांनी सावदा येथे जाऊन त्यांचा जबाब घेतला. फैजपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट देऊन माहिती घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -