fbpx

‘महाराष्ट्र बंद’ला लोक संघर्ष मोर्चा, संयुक्त किसान मोर्चाचा पाठींबा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । उत्तरप्रदेशातील लखमीपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या या हाकेला लोकसंघर्ष मोर्चा व संयुक्त किसान मोर्चाने पाठींबा दिला आहे.

केंद्र सरकार व त्याच पक्षाचे सरकार असलेले राज्य सरकारे ज्या पध्दतीने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या विरुद्धच्या आमच्या लढ्याला बळ मिळावे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकसंघर्ष मोर्चाच्या जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, धुळे, औरंगाबाद, पुणे, सातारा, नाशिक, यवतमाळ येथील सर्व प्रतिनिधी या आंदोलनात सामील होतील. महाराष्ट्रातील व्यापारी, कामगार आणि सामान्य नागरिकांनी हा बंद यशस्वी करत आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या लढयाला बळ द्यावे, असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे, कथा वसावे, सचिन धांडे, आतिश जगताप, भरत कर्डिले, प्रकाश बारेला, ताराचंद पावरा, ईश्वर पाटील, चंद्रकांत चौधरी, अशोक पवार, पन्नालाल मावळे, सुप्रिया चव्हाण, तेजस्विता जाधव, केशव वाघ, सोमनाथ माळी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज