fbpx

निराधार सुपडाबाईस अखेर मिळाले हक्काचे घर ; प्रहारच्या प्रयत्नांना यश

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । जामनेर तालुक्यात रांजणी या छोट्याशा गावी निराधार सुपडाबाई यास कोणताही सहारा तर नव्हताच पण घराला छत सुद्धा नव्हते. घराच्या आजूबाजूला गोणपाट..जुनाट चादर कापड वगैरे घराला लावून असह्या अशा वेदनांनी जीवन जगत होती. ही बातमी प्रहार नेते ना. बच्चुभाऊ कडू अधिवेशनात असताना मेसेज द्वारे कळविण्यात आली.

लोकनायक बच्चुभाऊ कडू यांनी अधिवेशनात असतानाच लगेच दुसऱ्या मिनिटाला त्वरित प्रहार जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांना मेसेज द्वारेच आदेश करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून मदत करण्यास सांगितले.

mi advt

त्यानुसार प्रहारची टीम तेथे दाखल होऊन निराधार सुपडाबाई यांना दोन महिन्याचा किराणा, साडी चोळी ,अंथरूण-पांघरूण व रोख स्वरुपात मदत केली आणि तात्काळ दुसऱ्या दिवशी झोपडीत विद्युत पुरवठा करून ग्रामपंचायत मार्फत नळकनेक्शन सुद्धा देण्यात आले.

सुपडाबाई यांना कोणताही आधार तर नव्हताच परंतु साधे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड सुध्दा नव्हते .कारण ती स्वतः शंभर टक्के अपंग असल्याकारणाने निराधार असल्याने कुठलेही कागदपत्र आढळून आले नाही.

त्वरित प्रहारतर्फे सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करत त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड मिळवून दिले.आणि अपंगांचा पगार सुद्धा तात्काळ सुरू करून दिला. त्या नंतर सुपडाबाईंच्या घराकरता सातत्याने पाठपुरावा करून हक्काचे घर हवे म्हणून घरकुल सुद्धा मंजूर करून दिले.

सदरहू घराचे भूमिपूजन वंदनीय नामदार,लोकनायक,अपंगांचे दैवत बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5 जुलाई रोजी रांजणी गावी जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  प्रहार भडगाव सरचिटणीस देवा महाजन, मनोजकुमार महाले, नीरज खैरनार, उमेश कोळी, भूषण सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष मयुर पाटील, उपाध्यक्ष विशाल हिवाळे, सचिव दिपक उंबरकर, ता.संपर्क प्रमुख भुषण कानडजे, महेश आहिर, दशरथ पाटील, राहुल मुळे, शिवम माळी, अक्षय कोकाटे, राधेश्याम कोळी,  निलेश दाभाडे, सचिन बोरसे, नितेश दारकुंडे आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज