fbpx

महागाईत खाद्यतेलाचा उडाला भडका ; वाचा ताजे दर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । पेट्रोल, डिझेल व गॅस दरापाठोपाठ खाद्यतेलाच्या किमतीही वधारल्या आहेत. परिणामी महागाईचा भडका उडाला असून, पहिल्यांदाच सूर्यफूल तेलाचे प्रतिलिटर दर १८० रु.वर गेले आहेत. 

एकीकडे कोरोना संसर्गजन्य स्थितीत लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार गेले आहे. यातच आहारातील प्रमुख घटक असलेल्या तेलाचे दर भडकले. स्वयंपाकघरात रोजच लागणाऱ्या मालापैकी शेंगदाणे, खाद्यतेल व डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. खाद्यतेलांच्या आयातीवर भारताला अवलंबून राहावे लागते. पेट्रोलप्रमाणे सर्वाधिक आयात खाद्यतेलाची हाेते. वर्षभरात केंद्र सरकारने दोनवेळा खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली. त्यानंतर परदेशातील खाद्यतेल उत्पादकांनी दरात वाढ केली. जागतिक बाजारपेठेत चीननंतर भारत खाद्यतेलांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश असल्याची माहिती तेल विक्रेत्यांनी दिली.

गेल्या सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. सामान्य ग्राहकांना १५० रुपये किलोप्रमाणे सोयाबीन तेलाची खरेदी करावी लागत आहे. यासह सूर्यफूल, शेंगदाणा, पाम तेलाच्याही किमतीत याच तुलनेत वाढल्या आहेत. खाद्यतेलाची मोठी आयात परदेशातून करण्यात येत आहे. तेलबियांच्या उत्पादनात घट, वाहतूक खर्च, आयात शुल्कात वाढ यामुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

खाद्यतेलाचे प्रकार (प्रति किलो रुपये)

शेंगदाणा १८०

सोयाबीन १४८

सूर्यफूल १८०

पाम तेल १३५

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज