खान्देशातील पाणी प्रश्नावर रविवारी बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ ।  खान्देश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्यावतीने रविवारी खान्देशातील पाणी विषयक प्रश्नावर ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

यात खान्देशच्या पाणी प्रश्नावर मान्यवर तज्दा मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने खान्देशच्या पाणी प्रश्नावर जल संवाद मालिका दर रविवारी सुरु करण्यात येणार आहे. त्यात खान्देशातील पाणीविषयक विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्याचा शुभारंभ रविवार १४ रोजी रात्री आठ वाजता होत आहे. यात सहज जलबोध निसर्गरक्षक मिला पाटील व जलपरिषदेचे कार्यवाह एन. एम. भामरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज