fbpx

गळफास घेऊन भादलीतील तरुणाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । जळगाव तालुक्यातील भादली येथील तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमिल बन्ने खान (रा. सिहोर मध्यप्रदेश ह.मु. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे.  याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नसून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, मोलमजुरी करून अमिल खान कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. काल अमिलचे आई-वडील खासगी कामाच्या निमित्ताने मालेगाव येथे गेले होते. त्यावेळी अमिल हा घरात एकटाच होता. दरम्यान घरी एकटा असल्यामुळे राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज