fbpx

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या ; शिरसोलीतील घटना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी उघडकीस आली. जगदीश प्रल्हाद पाटील (वय 32 रा. भोद ता.धरणगाव ह.मु. शिरसोली ता. जि. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, जगदीश पाटील हे शिरसोली येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्याला होते. पत्नी ८ दिवसांपासून माहेरी  गेल्याने ते घरी एकटीच होते. काल सोमवारी रात्री राहत्या घरात साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही बाब आज दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकिला आली आहे. 

दरम्यान, बहीण सुनंदा शांताराम पाटील हे दुपारी शेतातून घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला त्यामुळे त्यांना शंका निर्माण झाली. त्यांनी तातडीने नातेवाइकांना बोलून दरवाजा उघडला तर भावाने राहत्या घरात साडीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. भावाचा मृतदेह पाहून बहिणीने हंबरडा फोडला होता. याप्रकरणी तातडीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. 

मयत जगदीश पाटील यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, मुलगी जानू, मुलगा राज, दोन भाऊ असा असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज