शिरसोलीत जावयाची आत्महत्या, रत्नापिंप्री येथील सासू-सासऱ्यांवर गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । शिरसोली येथील अमोल प्रकाश चिंचोरे या तरुणाने सासू, सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्का दायक बाब रविवारी घडली. याप्रकरणी त्याचे सासरे भिमराव उत्तम धनगर व सासू शोभाबाई (रा. रत्नापिंप्री, ता. पारोळा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमोलने गळफास घेण्यापूर्वी सुसाइड नोट लिहीली होती. व्हाॅट‌्सऑपरवर स्टेट‌स अपडेट करुन स्वत:ला होणारा त्रास शेअर केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर अमोलच्या कुटुंबीयांना धक्का बसला. सासू, सासरे काही वर्षांपासून मानिसक त्रास देत असल्याचे अमोलने सुसाइड नोटमध्ये नमूद केले होते. त्यानुसार अमोलचा भाऊ रवींद्र यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोलच्या सासू, सासऱ्याच्या विरुद्ध अमोलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -