fbpx

कोळवद येथील तरुणाने घेतला गळफास

यावल तालुक्यातील कोळवद येथील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. घनश्याम रामसिंग पाटील (वय-३२) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, घनश्याम पाटील हात मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात.  दरम्यान,आज बुधवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरात कुणीही नसतांना लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.
याप्रकरणी राजू पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिडके यांनी केले .घनशाम पाटील यांनी आत्महत्या का केली ? हे स्पष्ट होवु शकले नाहीत . घटनेचे वृत्त कळताच पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांच्या सहकार्यानी मदतीसाठी धाव घेतली .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज