मकर संक्रांतीलाच २० वर्षीय तरुणाने संपविले जीवन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा इथे सकाळीच पतंग उडवत असताना दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारेला धक्‍का लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच एका २० तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. प्रमोद रविंद्र खैरनार (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मकर संक्रातीच्या दिवशी या दोन्ही घटनांमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुबा येथे प्रमोद खैरनार हा आई, वडील व लहान भावासोबत राहत होतेा. प्रमोदने दोन वर्षांपुर्वीच गावात सलूनचे दुकान टाकले होते. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता.

दरम्यान, आज शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी त्याचे आई, वडील व लहान भाऊ कामावर निघून गेले होते, तर प्रमोद हा घरी एकटाच होता. याचवेळी त्याने राहत्या घरात छताच्या हुकाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -