यावल येथे तरुण मुख्याध्यापकाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । यावल शहरातील समर्थ नगरात राहणाऱ्या ३६ वर्षीय मुख्यध्यापकाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे. विशाल बाबुराव गवळी (३६) असे मृत शिक्षकाचे नाव असून याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील राहणारे विशाल गवळी हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यापक म्हणून काम करतात. ते यावल शहरातील समर्थ नगरात राहत होते. काल रात्री पत्नी आई-वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता होता.याप्रकरणी यावल पोलिसांत लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -