अमळनेरात तरुण विवाहितेची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । अमळनेर शहरातील ढेकूरोडवरील एका तरुण विवाहित महिलेने घरात ओढणी व दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १२ रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास आनंद कॉलनीत घडली. सोनिया घन:श्याम काटे (वय ३४) असे त्या महिलेचे नाव आहे.

सोनिया यांचे पती घन:श्याम मुरलीधर काटे हे मंगळग्रह मंदिरात रात्र पाळीला ड्युटीला गेले असता सोनियाने घरात गळफास घेतला. ती मानसिक रुग्ण होती. धुळे येथील डॉ. गौतम शहा यांच्याकडे उपचार सुरू होते, अशी माहिती पती घन:श्याम यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar