तरुणाची आत्महत्या, पत्नीसह एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । जामनेर तालुक्यातील गोद्री येथील एका ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१७ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी मृताची पत्नी व अन्य एक अशा दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पहूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

युनूस वजीर तडवी (वय-३४) यांचा मृतदेह दि.१७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराच्या व्हरांड्यात आढळून आला होता. याप्रकरणी मृत युनूसची आई रेशमाबाई तडवी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मृताची पत्नी हाजराबाई तडवी व तांड्यातील नाना पूनमचंद नाईक यांच्यामुळे मुलगा युनूसने आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पाे.नि. अरूण धनवडे करीत आहेत.

मयत युनूस यांचा भाऊ नजीर तडवी हा मुंबई येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे. त्याने मी आल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नका, अशी सूचना केली. सोमवारी नजीर गावी पोहोचताच, त्याने मृतदेहाची पाहणी केली. यावेळी मृतदेहावर जखमा आढळल्याने त्यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माध्यमातून शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानुसार जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज