कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ ।  पारोळा तालुक्यातील मोरफळ येथील कर्जबाजारी झालेल्या तरुण शेतकऱ्याने नैराश्यामुळे शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली.  गणेश पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत रावसाहेब मगन पाटील यांनी पाेलिस ठाण्यात खबर दिली अाहे. तरुण शेतकरी गणेश पाटील याने शेतीसाठी विकास सोसायटी तसेच हातउचलचे ३ लाख रुपये कर्ज घेतले होते. अपेक्षित उत्पन्न न आल्याने ते नैराश्यात होते. ८ दिवसात थकबाकीमुळे शेतातील वीज कनेक्शन ताेडल्याने त्यांनी हताश होवून आपल्या शेतात विषारी पदार्थ सेवन केल्याचे खबरमध्ये म्हटले अाहे. गणेश पाटील यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ आहे. तपास सुनील वानखेडे करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -