fbpx

कर्जबाजारी पणाला कंटाळून जामनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली आहे. सतिश ईश्वर नाईक (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, मालखेडा येथील सतिश नाईक यांचे वडील कॅन्सर या आजाराने यापूर्वीच वारले आहेत. आणि आता आईलाही कॅन्सर आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचेही  कॅन्सरचे ऑपरेशन झाले. सतिश नाईक हे सततची नापिकीमुळे कर्जबाजारी झाले होते कर्जफेड करण्यासाठी कुठलाही पर्याय नसल्याने शेवटी कर्जाच्या विवंचनेत शेतीही विकावी लागली तरीही कर्ज न फिटल्यामुळे व कुटुंबाचीही जबाबदारी असल्याने शेवटी त्यांनी आज फाशी घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन लहान मुले , असा परिवार आहे ,त्यांच्या जाण्याने मालखेडा परिसरात खूप हळहळ व्यक्त होत आहे. पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज