दुर्दैवी.. नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या, १५ दिवसात गावातील चौथी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । इत्तया नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना यावल तालुक्यातील किनगाव येथे घडली. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. त्रिशिला अडकमोल (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून तिचे वडील किनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गावातील १५ दिवसातील ही चौथी घटना आहे.

याबाबत असे की, किनगाव येथील उपसरपंच शरद अडकमोल यांची मुलगी त्रिशिला अडकमोल ही इत्तया नववीच्या वर्गात होती. दरम्यान, त्रिशिलाची आई बाहेरगावी गेली असल्याने ती तिच्या वडीला सोबत घरी होती. वडील जेवण करून बाहेर गेल्यावर त्रिशिला अडकमोल हि घरात एकटीच होती. तेव्हा बऱ्याच वेळेने बाहेर दिसली नाही हे पाहुन शेजारी राहणाऱ्या तिला आवाज दिला मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने घराचा दरवाजा आतुन बंद केला असल्याने ग्रामस्थांनी भिंतीवरून घरात उडी घेतली. त्यावेळेस त्रिशिला ही घरातील छतास गळफास घेवुन मृत अवस्थेत आढळुन आली.

दरम्यान या संदर्भात यावल पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उप निरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.

किनगाव गावात मागील १५ दिवसातील आत्महत्या करण्याची ही चौथी घटना असून, आत्महत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात हा विषय चर्चचा बनला आहे. मात्र या अल्पवयीन मुलीने आत्महत्या सारखे पावुल का उचलले आहे या प्रश्नाचे उत्तर मिळु शकले नाही .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज