fbpx

मोहाडी येथे विवाहितेची आत्महत्या, घातपात झाल्याचा संशय

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । एका ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेतल्याचा प्रकार आज मंगळवारी दुपारी जळगाव  तालुक्यातील मोहाडी येथे उघडकीला आला आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी रूग्णालयात नेत असतांना तिचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. रेखा रमेश राठोड (वय-३५) असे मयत विवाहितेचे नाव असून सासरच्यांनीच मुलीला जाळल्याचा आरोप विवाहितेच्या आईवडीलांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, सुभाष वाडी येथील माहेर असलेल्या रेखा राठोड या मोहाडी येथील त्यांचे सासर , पती रमेश राठोड व दोन मुलांसह राहतात. आज मंगळवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी पती रमेश राठोड कामासाठी रिक्षा घेवून निघून गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास विवाहितेचे दोन्ही मुले बाहेर खेळण्यासाठी गेले होते.

यावेळी त्यांनी दुपारी अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. अंगावर डिझेलने पेट घेताच घरातून धुर निघायला लागला. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धाव घेवून आग विझविली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच मयत विवाहितेचे आई-वडिलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला होता. दरम्यान सासरच्यांनीच मुलीला जाळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक सुनील सोनार आणि पो.कॉ. शांताराम पाटील हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt