जळगावात परप्रांतीय कर्मचाऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । जळगावातील एमआयडीसीमधील मयुरेश गारमेंटमधील शिलाई मशीन परप्रांतीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. परवेशकुमार उर्फ पिंटू गौड ( वय 34) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे.

याबाबत असे की, उत्तर प्रदेशमधील परवेशकुमार उर्फ पिंटू गौड हा मयुरेश गारमेंट कंपनीत कपडे शिलाई मशीनवर काम करीत होता. येथे तो गेल्या १ वर्षांपासून काम करीत होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत काम करणारे कर्मचारी आले असता आतून कुलूप होते. नंतर कर्मचाऱ्यानी बाजूचे प्लायवूड तोडून बघितले असता कंपनीच्या शिलाई मशीनसमोरील पंख्याखाली परवेशकुमार यांने गळफास घेतल्याचे निदर्शनात आले.

कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या संचालिका कीर्ती वारके यांना फोनद्वारे कळविल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले पोलिसांनी मुर्तदेह खाली उतरून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. त्याचे नातेवाईक उत्तरप्रदेशमधून निघाले आहे. आत्महत्या का केली अद्याप कारण स्पष्ट कळू शकले नाही. पिंटूच्या पश्चात पत्नी, चार मुले, 1 मुलगी भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar