fbpx

कर्जबाजारीपणाला कंटाळून मांडवे बु.येथील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १० मे ला उघडकीस आली. शांताराम वामन जाधव  असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शांताराम जाधव हे मांडवे बुद्रुक येथे आपल्या कुटुंबासहित राहतात.त्यांच्यावर तीन मुलींचे लग्न, तसेच शेतात उत्पन्न होत नसल्याने लग्नासाठी काढलेले कर्ज व घरात लागणारा खर्ज दिवसेंदिवस वाढत गेला. सावकारी व बँकाचे कर्ज वेळेत न दिल्याने, जाचाला कंटाळून त्याने स्वतःच्या शेतात दि. १० रोजी विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्याच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुली व मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज