fbpx

पाचोऱ्यात दिव्यांग विवाहितेची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । पाचोरा शहरात एका ३१ वर्षीय विवाहित दिव्यांग महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. अर्चना रमेश चव्हाण असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत असे की, पाचोरा येथील कृष्णापूरी भागातील अंबिका किरणा स्टोअर्सचे संचालक रमेश चव्हाण यांची पत्नी अर्चना रमेश चव्हाण हिने आज सकाळी आठ वाजता पती किराणा दुकानात असतांना घराच्या मागच्या खोलीत गळफास घेऊन आमहत्या केली. पती पत्नी रमेश व अर्चना हे दोघे अपंग असून किराणा दुकान चालवत सुखाने संसार करीत होते. आत्महत्येच्या  आदल्या दिवशी सकाळी रमेशच्या आईची वर्षी साजरी केल्यानंतर दुपारी किरणा दुकानात सत्यानारायणाची पूजा करण्यात आली. 

त्यानंतर अर्चना हिने रात्री नऊ वाजेपर्यंत गल्लीतील रहिवाशांना सत्यनारायणाचा प्रसाद वाटप केला. घरात कुणाहीशी वाद नसतांना अर्चनाने आत्महत्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अर्चना हिस दोन लहान मुले आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेमुळे कृष्णापूरी परीसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज