fbpx

बहाळ येथील मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. अस्संबर सदा मोरे (वय- ४६) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव असून या प्रकरणी चाळीसगाव मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, बहाळमधील अस्संबर मोरे हे हातमजूरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह तो करीत होते. त्यांनी काल रविवारी गिरणा नदीच्या काठी असलेल्या बावरा नाले येथील बाभळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

mi advt

रम्यान मोरे यांच्या मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तिघा मुलींचे लग्न झाल्यामुळे मोरे यांच्या पाश्चात्य पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. या संदर्भात वाल्मिक दिगंबर मोरे (रा. बहाळ) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास प्रताप मथूरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज