fbpx

पिंप्राळ्यातील विवाहितेची बांभोरीत गळफास घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेने घरात कुणीही नसताना सासरी बांभोरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.

 

कविता राकेश सोनवणे (वय-२२) रा.दत्तनगर, वाल्मिक नगर, बांभोरी ता.धरणगाव असेम यत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

जळगावातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या कविता सोनवणे यांचे बांभोरी येथील सासर आहे. शनिवारी त्या मुलीला घेऊन माहेरी आल्या होत्या. मुलीला घरी ठेऊन त्या पुन्हा सासरी गेल्या. रविवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारासघ रात कुणीही नसतांना त्यांनी छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता यांचा विवाह दोनवर्षांपुर्वी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. दरम्यान, नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पाळधी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज