fbpx

पिंप्राळा हुडकोतील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । शहरातील पिंप्राळा हुडको भागात असलेल्या सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. हितेश नाना बाविस्कर (वय-२५) असे मयत तरूणाचे नाव आहे.

पिंप्राळा परिसरात असलेल्या सिद्धार्थ नगरात हितेश बाविस्कर हा आईवडीलांसह राहतो. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरात एकटा असतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मृतदेह उतरवून तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी संदीप पाटील यांना मयत घोषीत केले.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत हितेश बविस्कर यांच्या पश्चात आई लताबाई, वडील नाना बाविस्कर, पत्नी राणी आणि १ वर्षाची मुलगी आणि बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार विनोद सोनवणे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज