घरासमोरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथील एका तरुणाने राहत्या घरासमोर आलेल्या निंबाल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. नारायण त्र्यंबक उबाळे (वय-२७)  असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान,  याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, नारायण उबाळे नामक तरूण गॅरेज व्यवसायासह ट्रॅक्टर रोटावेटर चालविण्याचे काम करीत होते. बुधवारी रात्री ते ट्रॅक्टर रोटावेटरच्या कामासाठी दुसऱ्याच्या शेतावर गेले होते. शेतातील काम आटोपून रात्री २ वाजेच्या सुमारास ते घरी आले. सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना नारायण उबाळे यांनी घराच्या बाहेर येऊन दाराला बाहेरून कडी लावली आणि समोरच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

दरम्यान, नारायण याने आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्यापही कळू शकले नाही. परंतु तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेने घरातील सर्व कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत नारायणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार असून मयत नारायणचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -