एरंडोल येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल येथील सय्यद वाड्यातील एका ३० वर्षीय विवाहितेने रविवारी सकाळी किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

एरंडोल येथे सय्यद वाड्यातील रहिवासी फिरोजा अखिल पिंजारी (वय-३०) या विवाहितेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर किचनमध्ये घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील व संतोष चौधरी हे पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज