fbpx

लग्नाच्या मेहंदीचा रंग तसाच आणि तिने घेतला गळफास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेर असलेल्या आणि १० दिवसाआधी लग्न झालेल्या १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळ उघडकीस आली. करीना सागर निकम (वय १९) असे आत्महत्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, न्हावी येथील माहेर असलेल्या करीना निकम हिचे ११ जुलै २०२१ रोजी सागर राजू निकम यांच्याशी विवाह झाला होता. करीनाच्या सासू निर्मलाबाई राजू निकम ह्या जळगाव शहरातील माजी नगरसेविका आहेत. 

दरम्यान, हातावरील मेहंदी सुकत नाही तोच लग्न झाल्यानंतर १० दिवसांतच करीनाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी सासरे राजू निकम, पती सागर निकम हे कामावर गेले होते. दिर नागेश निकम घरात झोपलेला होता.

सासुबाई निर्मलाबाई निकम बाहेर होत्या. यावेळी करीनाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोद करण्यात आली आहे. करीना हीचे माहेर यावल तालुक्यातील न्हावी येथील आहे. करीनाने गळफास का घेतला याबाबत कारण गुलदस्त्यात आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करीत आहे. करीना हिचे माहेरची मंडळी देखील रुग्णालयात आली होती. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज