fbpx

विखरण येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील विखरण येथे ३५ वर्षीय तरुणाने घरातील लाकडाच्या कडीला सूती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

विखरण येथे ज्ञानेश्वर कौतिक अहिरे (वय ३५) व त्यांची पत्नी आशाबाई हे दोन मुलांसह राहतात. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दोघे पती-पत्नी हे इतर शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करतात. दरम्यान, ज्ञानेश्वर अहिरे यांची पत्नी आशाबाई ही सुरेश अहिरे यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाई घरी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा आतून लावलेला दिसला. दरवाजा ठोठावला मात्र, ताे न उघडल्यामुळे हिरालाल अहिरे, राजेंद्र पाटील, रवींद्र अहिरे यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

या वेळी ज्ञानेश्वर अहिरे यांनी कडीला दोर बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. अहिरे यांना तत्काळ खाली उतरून एरंडाेलच्या ग्रामीण रुग्णालय दाखल केले. तेथे डॉ. तन्मय महाले, डॉ.मुकेश चौधरी यांनी तपासून ज्ञानेश्वर यांना मृत घोषित केले. शनिवारी सकाळी मृत ज्ञानेश्वर अहिरे यांच्यावर विखरण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली अाहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज