fbpx

अविवाहित इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील हिंगोणा येथील अविवाहित इसमाने ग्रामपंचायतीच्या गाव विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडलीय. कल्पेश रमेश भोळे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत असे की, कल्पेश भोळे यांनी ग्रामपंचायतीच्या गाव विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. त्यांच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला विहिरीतून काढण्यासाठी प्रयत्न केला. 

पण विहिरीचे पाणी ४० फुटांपर्यंत खोल होते. त्यामुळे मृतदेह सुरुवातीला सापडला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मारूळ येथील पाणबुड्याच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. नंतर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तो मनोरुग्ण होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

कपिल दिनकर खाचणे यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. तपास सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बराटे, विनोद पाटील करीत आहेत. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज