fbpx

भुसावळात रेल्वे गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । बिहार राज्यातील मुळ रहिवासी व सध्या गुर्जर कॉलनी, प्रल्हादनगर भागात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या ३१ वर्षीय रेल्वे गार्डने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनिलकुमार राम सिंग (वय ३१, रा. शिवनाथपूर, जि. समस्तीपूर, बिहार) असे मृत रेल्वे गार्डचे नाव आहे. दरम्यान, अनिलकुमार सिंग यांनी किमान तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असल्याने मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. फोन उचलत नसल्याने, गार्डच्या मित्रांनी घरी येऊन पाहणी केली असता आत्महत्येचा प्रकार समोर आला.

याबाबत असे की, रेल्वेत गार्ड अनिलकुमार राम सिंग हे सहा महिन्यांपुर्वीच ते भुसावळ शहरातील प्रल्हाद नगर भागात रहायला आले होते. दरम्यान, त्यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिलकुमार यांनी फोन न उचलल्यामुळे रेल्वेतील त्यांच्या मित्रांनी घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी घराचा दरवाजा आतून लावला होता. मागील दरवाजा तोडून पाहिल्यानंतर अनिलकुमार सिंग यांनी किचनमधील आसारीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

mi advt

मृतदेह कुजल्यामुळे सिंग यांनी तीन दिवसांपुर्वीच आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. याप्रकरणी पंचनामा करून  बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. रविवारी शवविच्छेदन करून रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत सिंग यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज