एरंडोल येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । एरंडोल येथील जहांगीरपुरा भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी घडली. जितेंद्र लोचन शर्मा वय-३० असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र शर्मा हे आपल्या परिवारासह जहांगीरपुरा भागात भाड्याच्या घरात राहत होते. ते सेंट्रींग चे काम करत होते.२९ जून मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपले असता शर्मा यांची पत्नी भल्या पहाटे लघुशंकेला उठली असता तिला तिचे पती घरात झोपलेले दिसले नाहीत म्हणून ती पुढच्या खोलीत गेली असता पाण्याच्या प्लास्टिकच्या नळीने घरातील पंख्याला बांधून जितेंद्र शर्मा यांनी गळफास घेतल्याचे तिला आढळून आले.

त्यानंतर तीच्या नातेवाईकांनी जितेंद्र शर्मा याला खाली उतरवून घरमालक व इतर नागरीकांच्या मदतीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील यांनी तपासणी केली असता जितेंद्र शर्मा मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला मृत शर्मा च्या पत्नीने खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शर्मा हा जोहर तालुका वरदवाटा जि.गोरखपुर (उत्तर प्रदेश) येथील मूळ रहिवासी असून एरंडोल येथे राहत होता. पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज