fbpx

अमळनेर येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । अमळनेर शहरातील विद्युतप्रभा कॉलनीतील २७ तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पूजा राजेंद्र पाटील (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, पूजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पूजा ही शहापूर शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.पाटील यांची कन्या आहे. पूजाने रात्री तीचे आई वडील व भाऊ यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर घराच्या वरील मजल्यावर रूममध्ये निघून गेली. नंतर जेवणासाठी तिला आईने आवाज दिला असता तिने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता,  दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता पूजा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

mi advt

रूमचा दरवाजा तोडून तिला उतरविण्यात आले,तिला सुरवातीला खासगी दवाखान्यात येथे नेले असता डॉ. संदीप जोशी यांनी मृत घोषित केले. यानंतर तीच मृतदेह अमळनेर ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला, सोमवारी तिचे शवविच्छेदन करून शहापूर येथे तिच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पुजाचा भाऊ मयूर राजेंद्र पाटील याने अमळनेर पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  दरम्यान, पूजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज