fbpx

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाचा पोलिस ठाण्यात आत्महत्या प्रयत्न

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । दारू पिण्यासाठी १०० रुपये देण्यास नकार दिल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगाराने शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सागर महारू सपकाळे उर्फ सागर पट्टी (रा. प्रजापतनगर) असे तरुणाचे नाव असून त्याने छोट्या पत्र्याची सुरी गळ्यावर, हातावर, पायावर मारून स्वत:ला जखमी केले. 

याबाबत असे की, रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला सागर सपकाळे हा रक्ताने माखलेल्या अवस्थेत शहर पोलिस ठाण्यात गेला होता. सागरच्या हातात धारदार लोखंडी पट्टी व कमरेला सुरी होती. पोलिस रवींद्र कडू पाटील यांच्याकडे बघून तो पैसे मागू लागला. पाटील यांनी त्याला पोलिस ठाण्यातून जाण्यास सांगितले. पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्याने पोलिसांना दिली. त्याला पुन्हा पोलिसांनी तेथून जाण्यास सांगितले. पोलिसांच्या सांगण्यावरून तो बाहेर तर गेला नाहीच. उलट १०० रुपये द्या नाहीतर अंगावर जखमा करून आत्महत्या करेल. तुमची तक्रार करेल, अशी धमकी त्याने पोलिसांना दिली.  त्यानंतर सुरीने स्वत:च्या हातावर, पायावर, अंगावर व गळ्यावर मारून दुखापत करून घेतली. 

दरम्यान, यावेळी त्याला आवरण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून एका पोलिसाच्या गणवेशाची कॉलर पकडली. त्यानंतर पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिरला, ठाणे अंमलदाराच्या टेबलावर हात आदळले व आरटीपीसी रूमचा दरवाजाही आपटला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळाला. यापूर्वीही त्याने शनिपेठ पोलिस ठाण्यात अशाच प्रकारे दोन वेळेस स्वत:ला जखमी करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज