fbpx

जिल्ह्यात शुगर बीटला मिळणार हमीभाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । खडका एमआयडीसी जवळ साक्री शिवारात शुगर बीट पासून इथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारला जात आहे. त्यासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे शुगर बीटची लागवड जे शेतकरी करणार आहेत त्यांना आता हमीभाव मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , नुकतेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राजस्थानी येथील दौसात येथे आंतरराष्ट्रीय रस्त्याची पाहणी करत असताना येणाऱ्या काळात दुचाकी व तीनचाकी तसेच काही प्रमाणात चार चाकी वाहने ही इथेनॉल वर चालणारी बनवण्यात येणार असून तसा कायदा लवकरच करण्यात येणार आहे अशी घोषणा केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिह्यात खडका एमआयडीसीजवळ शुगर बीटपासून साखर व इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे.  त्यासाठी कच्चामाल म्हणून शुगर बीटची लागवड राजनंदिनी बायोडिझेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत जळगाव जिल्ह्यातील शेती शिवारात करणार आहे.
  ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा आहे अशा इच्छुक शेतकऱ्यांनी  त्यांच्या शेतात शुगरबीटची लागवड केल्यास एक एकर मध्ये २० टन ते ४० टन पर्यत उप्तन्न होवु शकते.  या उप्तनाला २३०० ते २५०० रु टन असा हमी भाव कंपनी कडून मिळणार आहे. एकरी फक्त ३ हजार ते ४ हजार इतका खर्च येणार असून  सदर शुगर बिटचे पिक हे पाच महिन्याचे असल्याने उर्वरीत ७ महिन्यात आपण अन्य पिकांची लागवड करू शकतात . तसेच सदर शुगर बिट हे अंतरगत पिक म्हणुन ही घेवु शकतात. शुगरबीटची लागवड  सप्टेंबर -ऑक्टोबर – नोव्हेंबर  या महिन्यांमध्ये  शेतात करू शकता. पिकाची चांगली मशागत व खत, पाणी दिल्यास  एक  शुगर बीट कंद दोन कीलोपर्यंत भरू शकतो. तसेच शुगर बिटची लागवड करतांना दिड फुट लाईन / ओळीचे अंतर व तीन साडे तीन फुट दोन रोपा मधील अंतर ठेवायचे आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शुगर बीट ची लागवड करायची आहे अशा इच्छुक शेतकऱ्यांनी 9730218000 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज