शिष्यवृत्ती परीक्षेत झांबरे विद्यालयाचे यश

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ए.टी.झांबरे विद्यालयातील दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे ,ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पालवे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी तर आभार प्रदर्शन सुचेता शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतिश भोळे ,डी.बी.चौधरी , अशोक तायडे यांनी सहकार्य केले.

इयत्ता पाचवी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी : पूर्वा हेमंत पिंपळे, करण भूषण पाटील, साईराज समाधान पाटील, आदित्य मिलींद पाटील, प्रतिक विजय देवरे

इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी : कृष्णगिरी प्रमोदगिरी गोसावी ( जिल्ह्यात प्रथम), जास्वंदी संजय कुलकर्णी, हेताक्षी योगेश बारी, सुजल प्रदीप चौधरी, जिज्ञासा निंबा सोनवणे

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -