fbpx

वाळूच्या वाहनांसाठी घेतली लाच, उपनिरीक्षकसह हवालदार जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक वाहनावर करवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला जळगाव एसीबीच्या पथकाने आज गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक सुनील वाणी व पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळके (रा.पोलीस वसाहत,वरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

mi advt

डंपरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं.एम.एच.40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोघा आरोपींनी गुरुवारी लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्यातच आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात नोकरी केली त्या पोलिस ठाण्यातच दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसबाय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज