विद्यार्थ्यांनी समाजहितासाठी संशोधकवृत्ती जागृत ठेवावी : प्रा.कामाक्षी अग्निहोत्री

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । संशोधनातून लोकहित साधल्याशिवाय सामाजिक विकासाची प्रक्रीया गतिमान होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: मधील संशोधकवृत्ती समाजहितासाठी जागृत ठेवावी असे मत इंदौर येथील देवी अहिल्याबाई विश्वविद्यालयातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा.कामाक्षी अग्निहोत्री यांनी राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्र प्रसंगी मांडले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाव्दारे संशोधन पध्दती या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे दि.२७ व २८ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल.शिंदे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.आर.राणे, प्रा. एस.एस.जोशी (पुणे), डॉ.इंदुमती भारंबे आदी उपस्थित होते.

चर्चासत्राच्या प्रारंभी शैक्षणिक संशोधन प्रस्ताव लेखन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.ई.वायुनंदन यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. प्रा. ए.आर.राणे यांनी संशोधन हा विषय अतिशय महत्वपूर्ण असून या विषयावरील चर्चासत्राचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. मनिषा इंदाणी यांनी तर सुत्रसंचालन वैशाली अलोणी व पल्लवी क्षीरसागर यांनी केले व आभार नीलिमा पाटील यांनी मानले.

२४० विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला सहभाग

दुपारसत्रात संशोधन लेख सादर करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष इंदौर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य किरण दम्माणी हे होते. चर्चासत्रात २४० विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. संतोष खिराडे, डॉ. मनिषा जगतात, प्रा. जयश्री शिंगाडे, प्रा. रणजीत पारधे, प्रा. समाधान कुंभार, संशोधक जयश्री पाटील व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज