fbpx

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा राखली कायम

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या संगणक, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स विभागातील अंतिम वर्षाचे विध्यार्थी प्रेरणा पाटील व विश्वेश ताक या विध्यार्थ्यानी विद्यापीठाच्या परीक्षेत घवघवीत व भरघोस यश मिळवत महाविद्यालयाची निकालाची हीच परंपरा यंदा देखील कायम राखली.

प्रेरणा पाटील या विद्यार्थिनीने अंतिम वर्षात ९७.३३ टक्के गुण मिळवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम रँक मिळवली असून तिने अंतिम वर्षातील दोन्हीही सत्रात १० पॉइंटर मिळवलेले आहे. तसेच महाविद्यालयातील विश्वेश ताक या विद्यार्थ्याने तृतीय वर्षात ९६.८५ टक्के गुण मिळवुन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात द्वितीय क्रमांकाची रँक मिळवली आहे. विश्वेशने देखील तृतीय वर्षातील दोघेही सत्रात १० पॉइंटर मिळवलेला आहे. तसेच तृतीय वर्षातील अंतिम सत्रात ९ विध्यार्थ्यानी १० पॉइंटर मिळवलेला असून अंतिम वर्षातील शेवटच्या सत्रात १९ विध्यार्थ्यानी १० पॉइंटर मिळवलेला आहे. विध्यार्थ्यानी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल रायसोनी इस्टिट्युटचे संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल, उपसंचालक प्रा.डॉ. के.के. पालीवाल, विभागप्रमुख सोनल पाटील, प्रा.स्वाती पाटील, प्रा.हिरालाल सोळुंके, प्रा.शीतल जाधव, प्रा.हर्षद पाटील यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापकवर्ग व सहकाऱ्यांनी कौत्तुक करत विध्यार्थ्यांना त्याच्या पुढच्या वाटचालीस शुभेछया दिल्यात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज