‘एसटी’च्या नोटीसने बसला झटका, चोपड्याच्या वाहकाचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील राजाराम खंडू वळंजूवाणी (वय-५६) यांना चोपड़ा एसटी आगार व्यवस्थापकांनी कारणे दाखवा नोटीस दिल्याने हृदयविकाराचा झटका आला व दुसऱ्या दिवशी दि.११ रोजी मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालावली. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर जळगावातील हा पहिला बळी ठरला आहे.

चोपडा आगारातील एसटी वाहक राजाराम खंडू वळंजूवाणी हे एसटी कर्मचारी संपात सहभागी होते. रविवारी दुपारी त्यांना आगार व्यवस्थापकांची नोटीस मिळाली. शिस्त आवेदन कार्यपद्धती अंतर्गत कारवाई करण्याबाबतची ही नोटीस वाचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. एक दिवस चोपडा येथे उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक ढासळली. जळगावात हलविताच त्यांची दुसऱ्या दिवशी प्राणज्योत मालवली.

चहार्डी येथील शेटेवाडा भागातील रहिवासी व एसटीचे वाहक वकुंजवाणी यांना हृदयविकाराचा झटका आला असता चोपडा येथे एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूने चहार्डीसह चोपडा आगार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नोटीसनेच घात झाला, अशी त्यांच्या परिवाराची भावना असून संताप व्यक्त होत आहे. मयत वाहकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. वळंजूवाणी यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त करीत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी अनेकांना गहिवरून आले होते.

पहा एसटी कर्मचारी झाले भावूक :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar