fbpx

वादळाचा फटका : करंजीला केळीसह पिकांचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२१ । बोदवड तालुक्यातील करंजी येथे आलेल्या जोरदार वादळामुळे केळी, पपई, लिंबू, कपाशी यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असून रस्त्यांवरही झाडे उन्मळून पडली आहेत.

करंजी (ता. बोदवड) येथे जोरात आलेल्या वादळामुळे केळी, कपाशी, पपई, लिंबू यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. करंजी येथील प्रशांत पुरुषोत्तम पाटील, संभाजी नामदेव पाटील, विजय नामदेव पाटील, प्रभाकर नथू पाटील, विश्वनाथ निवृत्ती पाटील, भाऊराव नामदेव सोन्नी, भागवत आत्माराम पाटील, पप्पू पाटील, पंढरी बळीराम पाटील, बाळू पाटील, किशोर पाटील, शशिकांत पाटील यांसह इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, संदीप पाटील यांच्यासह रामदास पाटील, दिलीप पाटील, सरपंच जानकीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य एम.एस. पाटील यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज