नागरी वस्तीतील बिअरबारचे काम‎ थांबवा, नागरिकांचे पोलिसांना निवेदन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । जामनेर शहरातील पाचोरा रोड‎ परिसरातील वर्धमान नगरात‎ बिअरबारचे काम सुरू आहे. नागरी‎ वस्तीत बिअरबारला परवानगी देऊ‎ नये व तत्काळ काम थांबवावे अशी‎ मागणी वर्धमान नगरातील‎ रहिवाशांनी पालिका‎ प्रशासनासह पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली‎.

शहरातील पाचोरा रोड‎ ‎ परिसरातील गट क्रमांक २२८ हा‎ अकृषक झाला असून अनेक‎ नागरिकांनी आपली घरे बांधली‎ आहेत. याच गट नंबरमधील प्लॉट‎ क्रमांक ४१ व ४२ मध्ये बिअर बार‎ सुरु करण्याची परवानगी‎ मागितल्याची माहिती रहिवाशांना‎ मिळाली. त्या दृष्टीने संबंधीत‎ व्यक्तीने बांधकामही सुरू केले‎ आहे. सदरची जागा ही रहिवास‎ प्रयोजनार्थ असतांना त्याचा‎ ‎व्यावसायिक वापर केला जाणार‎ असल्याने हे काम तत्काळ‎ थांबवावे. अशी मागणी परिसरातील‎ रहिवाशांनी जामनेर पालिकेकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार‎ गिरीश महाजन, त्याचप्रमाणे पोलिस‎ प्रशासन, जिल्हाधिकारी‎ कार्यालयाचाही याबाबतच्या प्रति‎ देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने‎ दखल घेऊन ही समस्या सोडवावी,‎ अशी अपेक्षा आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -