कासारखेड्यातील दारू विक्री बंद करा : महिलांची मागणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । कासारखेडे ( ता.यावल ) येथील दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हावी, दारू विक्री बंद करावी, यासाठी गावातील महिला एकवटल्या आहेत. त्यांनी बुधवारी यावल पोलिसांसह तहसीलदारांना निवेदनाद्वारे गावात दारूबंदीची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गावात मोठया प्रमाणात दारू विक्री होत असून दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. गेल्या महिन्याभरात दारूच्या नशेत तीन जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. तसेच भविष्यात आणखी वाईट परिस्थिती गावात या दारूमुळे होऊ शकते. त्यामुळे गावातील दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन पोलिस निरीक्षक सुधीर पाटील तसेच तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी अाशा तडवी, अयनूर तडवी, नजमा तडवी, हमीदा तडवी, साबेरा तडवी, शाबजान तडवी, बानू तडवी आदी महिला उपस्थित हाेत्या.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -