जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरात दिवसभर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर स्थानिक बाहेरील छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. शिवाय विद्यार्थी पादचारी हे रस्त्याच्या आजूबाजूने जात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर शहरात गर्दी होते. त्यामुळे शहरावरून येणारे अवजड वाहने शहरात न येता ती बाहेरून बायपासने वळविण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्याकडेनिवेदनाद्वारे केली आहे.
चाळीसगाव शहरा बाहेरून बायपास रस्ता देखील आहे. असे असले तरी ही अवजड वाहने टोल चुकवण्यासाठी शहरातून भरधाव वेगाने शहरात येत असल्याने अपघात होण्याचे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. अनेक निरपराध जण या अपघातामध्ये जखमी, मृत्यू होत आहे. रयत सेनेच्या माध्यमातून अवजड वाहने बंद करावी त्यासाठी तत्कालीन सपोनि सुरेश शिरसाठ यांना निवेदन देऊन आंदोलन केले होते. त्यावेळेस त्यांनी याची दखल घेऊन हा प्रकार थोडाफार प्रमाणात थांबविला होता. त्यानंतर अवजड वाहने शहरातून मोठ्या प्रमाणात येत असल्याने व वाळु ने भरलेल्या अवजड वाहनाच्या धडकेत दि.२९ जुलै रोजी धुळे रोड वरील कु. सायली हाडपे या निरपराध विद्यार्थिनीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार शहरातून येणारे अवजड वाहने व त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे.
विशेष म्हणजे शहरातील ज्या रस्त्यावरून ही अवजड वाहतूक होते त्या रस्त्यावरच धुळे रोडवरील महाविद्यालय कोर्टाजवळ एच एच पटेल शाळा, छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रीय विद्यालय,नेताजी चौकातील आं. ब हायस्कूल, व्ही एच पटेल ही लहान मुलांची शाळा घाट रोडवर उर्दू मराठी शाळा आहेत. या सर्व शाळा जेव्हा भरतात आणि सुटतात तेव्हा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि त्यातच वाहनांच्या रांगेतून विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते. अगोदरच शहरातील रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होत असल्याने बाहेरून येणाऱ्या अवजड वाहने बायपास मार्गे शहरावरून वळवावे असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने मालेगाव रोड बायपास चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शहर वाहतूक पोलीस शाखा जबाबदार राहणार असल्याचे चाळीसगाव वाहतूक शाखेचे स. पो. नि तुषार देवरे यांना दि ५ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रत खासदार जळगाव, आमदार चाळीसगाव,अपर पोलीस अधीक्षक. भाग चाळीसगाव, डी वाय एस पी चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक .चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत, निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, अनिल कोल्हे, तालुका सहसंघटक दीपक शेटे,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,शहराध्यक्ष छोटू आहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, भूषण पाटील, ज्ञानेश्वर सोनार, सागर पाटील, श्रीकांत तांबे, भूषण पवार, राहुल पवार, नकुल पवार, कमलेश पवार, कृष्णा पवार ,पवन खैरनार, मंगेश पवार ,अक्षय पवार, मंगेश देठे ,अमोल पवार, गणेश पवार ,निखिल पवार, राजीव पवार, अभिषेक पवार, अभिषेक पाटील, अक्षय पवार ,ऋषिकेश पवार व प्रगत संस्थेचे अध्यक्ष खुशाल पाटील अदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत,