वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नाहीत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रांताधिकारी, तहसिलदार, वीज अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

 

राज्यात मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात नागरीक, शेतकर्‍यांना अव्वाच्या सव्वा वीजबिले विजवितरणतर्फे देण्यात आली. हे वीजबिल भरा अन्यथा कनेक्शन खंडीत करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजूर आणि छोटे व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रांताधिकारी, तहसिलदार, वीज अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लहरी हवामान, शेतमालाचे ढासळलेले बाजारभाव, कोरोनामुळे संकटात आलेले अर्थकारण यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच महावितरण कंपनीने अंदाजे भरमसाठ वीजबिले आकारल्याने थकबाकी वाढलेली आहे. तसेच विधिमंडळ अधिवेशन काळात महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडीत करणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

परंतू सरकारने घुमजाव करीत ग्राहकांचा विश्वासघात केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  वीज कनेक्शन खंडीत झाल्यामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही परिणाम पिके वाळली असून शेतकर्‍यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीज कनेक्शन पूर्ववत करावे अन्यथा वीज वितरण कर्मचार्‍यांना वसुलीसाठी फिरू देणार नसल्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर रासप तालूकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, डॉ. पी. जी. पळशीकर, आदिवासी संघटक तालुकाध्यक्ष विनोद मालचे, सरचिटणीस गोपाल महाजन रिंगणगांव आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -