पोलिसांवर दगडफेक, तिघे फरार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । जामनेरात सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या वृद्धाला ताब्यात देण्याच्या कारणावरून काही तरुणांनी जामनेर पोलिसांच्या वाहनावर शुक्रवारी दगडफेक केली होती. सलीम करीम बागवान, कैफ शेख रफिक व शाहरूख शेख साहेबू बागवान असे निघांची ओळख पडली असून त्यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिघेही आरोपी फरार असून ते सापडल्यानंतर आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तर, शुक्रवारी घडलेल्या विनयभंगाच्या घटनेचा शनिवारी पंचनामा केला.

जामनेर येथील जुन्या बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग वृद्धाने सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केला हाेता. त्यास घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर सलीम करीम बागवान, कैफ शेख रफिक व शाहरूख शेख साहेबू बागवान यांच्यासह काहींनी दगडफेक केली हाेती. यात चार पोलिस जखमी झाले होते. तर वाहनाची काचही फुटली आहे. दगडफेकीचे एका कर्मचाऱ्याने व्हिडिओ चित्रण केले आहे. त्याच व्हिडिओ चित्रणावरून या तिघांची ओळख पटली असून त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते तिघेही फरार आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विनयभंग प्रकरणी पोलिस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड यांच्यासह सहकाऱ्यांनी घरकुलाच्या ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा केला. या वेळी पोलिस कॉन्स्टेबल सुनील माळी, तुषार पाटील, नीलेश घुगे, अमोल वंजारी, चालक शाम काळे उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -